मुंबई – पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. यातच आता यासंदर्भात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
राऊतांवर करण्यात आलेल्या या कारवाईचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केले आहे. “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार”, असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
राऊतांवरील ईडी कारवाईने शिवसैनिक संतप्त; मैत्री बंगल्याबाहेर ईडी विरोधात घोषणाबाजी
किरीट सोमय्या म्हणाले, “संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार आहे. संजय राऊतांविरोधात मी पुरावे दिले आहेत. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार आहे. आता कारवाई सुरु आहे. संजय राऊतांची धावपळ सुरु होती, आता त्यांना हिशोब द्यायला जावंच लागणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.