कोल्हापूर – आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणील ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊतांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांना कोर्टात खेचण्याचा दावा केला आहे. विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली? जनतेचा पैसा कुठे गेला? याबाबत मी स्वतः कोर्टात याचिका दाखल करणार, असे कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांनी म्हटले आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्याकरता किरीट सोमय्या यांनी लाखो-कोट्यवधी रुपये जनतेकडून गोळा केले. हे पैसे जाहीरपणे गोळा केले. हे लाखो कोट्यवधी रुपये राजभवनावर जमा करू, असे सोमय्या म्हणाले होते. हे पैसे कुठे गेले, हे शेवटपर्यंत कोणालाही कळले नाही? हा इतका मोठा फ्रॉड, चोरी आहे. याविरोधात चौकशी सुरू होती. मात्र, सरकार बदलल्यानंतर या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. गेल्या सहा महिन्यांत 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम सरकारने राबवला. पण विक्रांत घोटाळा हा कधीच लपला जाणार नाही. तो मी असाच मागे पडू देणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/kejriwal-should-also-be-arrested-in-excise-policy-case-says-congress/ पालघर व कणेरी हत्याकांड सारखेच सत्ताधाऱ्यांनी आम्हाला पदावरून काढले म्हणून आम्ही पक्ष सोडणार नाहीत. अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने आणि बाळासाहेब ठाकरेंनी दिली. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली तर परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा, असेही त्यांनी यावेळी म्हटले. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/onion-export-purchase-of-3-thousand-quintals-of-onion-from-nafed-union-minister-bharti-pawar/ तसेच त्यांनी यावेळी कोल्हापूरातील कणेरी मठ येथे शिळे अन्न खाल्याने 54 गाईंच्या झालेल्या मृत्यूवरही भाष्य केले. ते म्हणाले, रेडाबळीप्रमाणे हा गोमातेचा बळी आहे का? हे पाहावे लागेल. आम्ही गायींना श्रद्धांजली वाहिली. विधिमंडळातही श्रद्धांजली अर्पण करतील. पालघरचे साधु हत्याकांड आणि कणेरी हत्याकांड हे मी एकच मानतो.