भाजप नेते दिलीप घोष आणि रिंकू मजूमदार यांची प्रेमकहाणी! 60व्या वर्षी घेतले सात फेरे

कोलकाता – पश्चिम बंगालमधील भाजप नेते आणि माजी खासदार 60 वर्षीय दिलीप घोष यांनी कोलकात्यातील न्यू टाउन येथील आपल्या निवासस्थानी अत्यंत साध्या आणि खासगी समारंभात भाजप कार्यकर्त्या रिंकू मजूमदार यांच्याशी विवाह केला. या विवाह सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार आणि खासदार लॉकेट चटर्जी यांच्यासह पक्षाचे काही निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. या विवाहातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वऱ्हाडी म्हणून हजेरी लावली.
रिंकू मजूमदार बनल्या नववधू –
50 वर्षीय रिंकू मजूमदार या न्यू टाउन येथील भाजप महिला मोर्चाच्या सक्रिय नेत्या आहेत. त्या घटस्फोटित असून त्यांना 26 वर्षांचा मुलगा आहे, जो कोलकात्यातील सॉल्ट लेक येथे आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. दिलीप आणि रिंकू यांची ओळख पक्षाच्या कार्यक्रमांदरम्यान झाली आणि हळूहळू त्यांच्यातील जवळीक वाढली. विशेष म्हणजे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांच्या पराभवानंतर रिंकू यांनीच त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता.
साधेपणा आणि मर्यादित पाहुणे –
हा विवाह सोहळा पूर्णपणे खासगी आणि साधेपणाने पार पडला. यात फक्त जवळचे नातेवाईक आणि मोजक्या भाजप नेत्यांनी हजेरी लावली. सूत्रांनुसार, भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते वऱ्हाडी म्हणून या समारंभात सहभागी झाले. कोणताही भव्य समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता, परंतु भविष्यात दिलीप यांच्या मूळ गावी खडगपूर येथे मोठा समारंभ आयोजित करण्याची योजना आहे. लग्नाची बातमी समजताच सुकांत मजूमदार आणि लॉकेट चटर्जी यांच्यासह अनेक नेते फुले आणि मिठाई घेऊन शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.
The final wedding moment of @DilipGhoshBJP marriage . pic.twitter.com/KxOs8xhQPQ
— Kamalika Sengupta (@KamalikaSengupt) April 18, 2025
आईच्या इच्छेने घेतला विवाहाचा निर्णय –
दिलीप घोष 1984 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडले गेले होते आणि 2014 मध्ये ते भाजपमध्ये सक्रिय झाले. आतापर्यंत अविवाहित असलेल्या दिलीप यांच्या आई, पुष्पलता घोष, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासाठी योग्य जोडीदार शोधत होत्या. 60 वर्षांनंतर, आईच्या इच्छेनुसार आणि रिंकू यांच्या प्रस्तावामुळे दिलीप यांनी आपल्या आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात केली. असे सांगितले जाते की, रिंकू यांनी दिलीप यांच्या आईंशी भेट घेऊन त्यांना लग्नासाठी राजी केले.
दिलीप आणि रिंकू यांची प्रेमकहाणी-
दिलीप आणि रिंकू यांची पहिली भेट पक्षाच्या कार्यक्रमांदरम्यान झाली होती. 2021 मध्ये कोलकात्यातील इको पार्क येथे माॅर्निंग वाॅक दरम्यान त्यांची मैत्री वाढली. रिंकू यांनी दिलीप यांच्या प्रेरणेने भाजपच्या महिला मोर्चात सक्रिय सहभाग घेतला आणि त्या पक्षाच्या ओबीसी मोर्चा आणि हस्तकला प्रकोष्ठातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप यांना बर्धमान-दुर्गापूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता, तेव्हा रिंकू यांनी त्यांना भावनिक आधार देत लग्नाचा प्रस्ताव मांडला. सुरुवातीला नकार देणाऱ्या दिलीप यांनी आईच्या आग्रहाखातर हा प्रस्ताव स्वीकारला.
দিলীপ ঘোষকে শুভেচ্ছা জানালেন সুকান্ত মজুমদার
Dilip Ghosh Dr. Sukanta Majumdar#DilipGhosh #SukantaMajumder #married #marriage #congratulation #DilipGhoshmarried #BanglaNews #RinkuMajumder #RSS #BJP #NewsBangla7 #reelsfeed #shortsfeed #reels #shorts #viralvideo #viral pic.twitter.com/1hxtciAkrf— News Bangla 7 (@news_bangla_7) April 18, 2025
राजकीय आणि सामाजिक चर्चा –
दिलीप घोष यांच्या या लग्नाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष आणि देबांगशु भट्टाचार्य यांनीही सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. कुणाल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “हा वैयक्तिक निर्णय आहे, यात राजकारण शोधू नये.” या लग्नाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, अनेकांनी दिलीप आणि रिंकू यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Dilip Ghosh’s soon-to-be wife, Rinku Majumdar, is on her way to the marriage hall. #DilipGhosh @DilipGhoshBJP pic.twitter.com/qlWafe7Wfo
— Kamalika Sengupta (@KamalikaSengupt) April 18, 2025
दिलीप घोष यांचा राजकीय प्रवास –
दिलीप घोष यांनी 1984 मध्ये RSS मध्ये प्रवेश केला आणि 2014 मध्ये भाजपमध्ये सक्रिय झाले. 2015 ते 2021 या काळात ते पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 42 पैकी 18 जागा जिंकल्या. ते 2016 ते 2021 या काळात खडगपूर सदरचे आमदार आणि 2019 मध्ये मेदिनीपूरचे खासदार होते. 2024 मध्ये त्यांना बर्धमान-दुर्गापूर येथून पराभव स्वीकारावा लागला. सध्या ते पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते.





