भाजप नेते ब्रिजभूषण सिंह म्हणाले,’हरियाणावर बोलण्यास मनाई…’

Haryana Elections । हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. आता आठ निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी सर्व एक्झिट पोल जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी युती आणि हरियाणामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत.
याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहे. यात भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांना विचारण्यात आले की, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये सरकार कोण बनवेल, यावर ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार स्थापन करेल. त्याचबरोबर हरियाणाबाबत ते म्हणाले की, हरियाणावर बोलण्यास मनाई आहे.
भाजपने ब्रिजभूषण शरण सिंह यांना कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याविरोधात वक्तव्य करण्यापासून दूर राहणार असल्याच सांगितलं. कारण त्यांनी दोन्ही कुस्तीपटूंना काँग्रेसमध्ये जाण्यावरून टार्गेट केले होते. माजी डब्ल्यूएफआय प्रमुख म्हणाले की, ‘विनेश आणि बजरंग यांनी कुस्तीमध्ये नाव कमावले आणि त्यातून प्रसिद्ध झाले, पण आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे नाव पुसले जाईल. यासोबतच ब्रिजभूषण यांनी विनेशवर कुस्तीला बदनाम केल्याचा आरोप केला.’
ते म्हणाले की, ‘विनेश आणि बजरंगने कुस्तीचे वातावरण बिघडवले आहे. काँग्रेसने विनेशचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आणि हरियाणाच्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस विनेश आणि बजरंग यांचा प्यादे म्हणून वापर करत असल्याचेही त्यांनी सांगितले.’
विनेश फोगट आणि बजरंग पुनिया त्या कुस्तीपटूंमध्ये होते ज्यांनी गेल्या वर्षी दिल्लीतील जंतरमंतरवर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक कनिष्ठ महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. या घटनेनंतर भारतीय कुस्ती विश्वात खळबळ उडाली होती.
======================





