हरियाणा निवडणुकीत वीरेंद्र सेहवागची एन्ट्री

Haryana elections । हरियाणामध्ये ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यापूर्वी आज गुरुवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज सायंकाळी सहा वाजता निवडणूक प्रचाराचा तोफा थंडावणार आहे. दरम्यान, कोणताही उमेदवार आपल्या प्रचारात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. स्टार प्रचारकही आपापल्या उमेदराच्या प्रचारासाठी मतदारांना मतांसाठी आवाहन करत आहेत. यातच बुधवारी माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हरियाणातील तोशामला पोहोचला. येथे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी मते मागितली.सेहवागने अनिरुद्ध चौधरीला मोठा भाऊ म्हटले.
यावेळी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “तो आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आला आहे. जेव्हा मोठा भाऊ काही काम करतो तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन त्याला मदत केली पाहिजे.’ तर अनिरुद्ध चौधरी म्हणाले, “सामान्यतः क्रिकेटपटू निवडणूक प्रचारासाठी जात नाहीत, पण वीरेंद्र सेहवाग नेहमीच येतो, मला कधी बोलण्याची गरज नाही. इथे आल्याबद्दल मी वीरूचा आभारी आहे.”
अनिरुद्ध चौधरी जनतेला दिलेली आश्वासने नक्कीच पूर्ण करेल, असे सेहवागने सांगितले. कारण त्यांना प्रशासन चालवण्याचा अनुभव आहे. मी तोशामच्या लोकांना खात्री देतो की जर माझा भाऊ निवडून आला तर तो तुम्हाला निराश करणार नाही तर तुम्हाला आनंद देईल.’
Haryana elections । तोशाम जागेवर भाऊ-बहिणीमध्ये स्पर्धा
तोषम जागेवर माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची नात श्रुती चौधरी आणि नातू अनिरुद्ध चौधरी यांच्यात लढत आहे. श्रुती चौधरी ही अनिरुद्ध चौधरीची चुलत बहीण आहे. श्रुती ही किरण चौधरी यांची मुलगी आहे, तर अनिरुद्ध चौधरी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रणवीर सिंग महेंद्र यांचा मुलगा आहे. याआधी श्रुती चौधरी भिवानी-महेंद्रगड मतदारसंघातून खासदार होत्या.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा श्रुती चौधरीला तिकीट मिळाले नाही तेव्हा तिने आई किरण चौधरी यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. किरण चौधरी भाजपकडून राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. त्यामुळे भाजपने तोशाममधून श्रुती चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. तोशामची जागा भाजपला अद्याप जिंकता आलेली नाही, त्यामुळे या जागेवर भाजपची विशेष नजर आहे.
हे वाचाल का ? ‘चेहऱ्यावर घाम अन् श्वास घेण्यास त्रास’ तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढतांना पवन कल्याण यांची प्रकृती बिघडली





