BJP Leader | Arrested: तांदुळ चोरी प्रकरणी भाजप नेत्याला अटक !

BJP Leader | Arrested – कर्नाटक सरकरच्या अन्न भाग्य योजनेतील तांदूळ चोरी केल्याप्रकरणी भाजप नेते मणिकांत राठोड याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
शहापूर पोलिसांनी राठोडला जिल्हा मुख्यालयातील कलबुर्गी येथील राहत्या घरातून अटक केली. यादगीर जिल्ह्यातील शहापूर येथील सरकारी गोदामातून दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ६०७७ क्विंटल तांदूळ चोरी केल्याप्रकरणी मणिकांतला अटक करण्यात आली.
भाजप नेत्याला पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
राठोड यांनी २०२३ ची विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांच्याविरुद्ध लढवली होती आणि त्यात त्यांचा पराभव झाला होता.
अन्न भाग्य योजनेतून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कर्नाटक सरकार दर महिन्याला १० किलो धान्य मोफत देत असते.





