झारखंड सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न
Updated On:

रांची – विरोधी पक्ष भाजपकडून झारखंड सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय, खोटी माहिती पसरवण्यासाठी सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांचा वापर केला जात आहे, असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. सोरेन यांनी राज्य विधानसभेत आपल्या दीड तासाच्या भाषणात हे आरोप केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाशी खोटे बोलल्याचाही आरोप केला आहे. राज्यांना खर्च न करता आयुष्मान भारतचा फायदा झाला आहे, असे मोदींनी म्हटले आहे मात्र वास्तविक योजनेचा 40 टक्के खर्च राज्यांना करावा लागतोय, असे सोरेन यांनी म्हंटले आहे. 14 वर्षांच्या राजवटीत भाजपने झारखंडचा विकास केला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकार झारखंडला सावत्र वागणूक देत असल्याचेही मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हंटले.





