“भाजप सरकारचा अमानवी आणि असंवेदनशील चेहरा उघड”; सातारा प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Rahul Gandhi | सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या २८ वर्षीय डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्यभर खळबळ उडाली आहे. गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रात्री फलटणमधील हॉटेल ‘मधूदीप’च्या खोलीत त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले.
सुसाईड नोटमध्ये PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर बलात्कार व छळाचे आरोप केले असले, तरी डॉ. मुंडे यांच्या रुग्णालय प्रभारी अधीक्षक डॉ. धुमाळ यांना लिहिलेल्या पत्रात खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांचा उल्लेख असल्याने राजकीय वाद भडकला. या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र के सतारा में बलात्कार और उत्पीड़न से तंग आकर डॉ. संपदा मुंडे की आत्महत्या किसी भी सभ्य समाज की अंतरात्मा को झकझोर देने वाली त्रासदी है।
एक होनहार डॉक्टर बेटी, जो दूसरों का दर्द मिटाने की आकांक्षा रखती थी, भ्रष्ट सत्ता और तंत्र में बैठे अपराधियों की प्रताड़ना का शिकार…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 26, 2025
ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या
राहुल गांधींनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “महाराष्ट्रातील साताऱ्यात बलात्कार आणि अत्याचारामुळे त्रस्त होऊन एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. ही घटना कोणत्याही सभ्य समाजाच्या अंतःकरणाला हादरा देणारी आहे. ही तरुण आणि कुशल डॉक्टर समाजातील इतरांचे दु:ख दूर करण्याचे स्वप्न पाहत होती. परंतु सत्तेच्या भ्रष्ट आणि गुन्हेगार संरचनेच्या पंजात सापडली.
ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे. ज्यांच्या हातात नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्याच लोकांनी या निरपराध डॉक्टरवर सर्वात घृणास्पद अत्याचार केला. बातम्यांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचारात सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. ही सत्ता-प्रणीत गुन्हेगारी विचारसरणीचे सर्वात कुरूप उदाहरण आहे.” Rahul Gandhi |
…न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची?
ते पुढे म्हणतात, “जेव्हा सत्ताधारी गुन्हेगारांचे रक्षक बनतात, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची? या घटनेने महाराष्ट्रातील भाजप सरकारचा अमानवी आणि असंवेदनशील चेहरा उघड झाला आहे. आम्ही या लढाईत पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत. भारतातील प्रत्येक मुलीला भीती नव्हे, न्याय मिळायला हवा,” अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. दरम्यान,याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर या दोघांनीही पोलिसांनी अटक केली आहे. Rahul Gandhi |
हेही वाचा :





