पुणे : राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थिती दर्शवण्यासाठी पुण्यातून सुमारे ५०० भाजप कार्यकर्ते गुरुवारी मुंबईला जाणार आहेत. आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या सोहळ्याला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पुण्यातील शहराध्यक्ष, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहेत. या कार्यकर्त्यांनी त्यांची जाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.