‘विरोधकांच्या राजकारणामुळे भाजप सत्तेपासून वंचित’
Updated On:

पुणे – विरोधकांनी केलेल्या अंकगणितीय राजकारणामुळे पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
झारखंड येथील निकालाबाबत फडणवीस म्हणाले, “देशातील अनेक राज्यांत निकाल पाहता भाजपला बहुमत मिळाले आहे. मात्र, विरोधकांनी केलेल्या अंकगणितीय राजकारणामुळे पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागत आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही याच राजकारणाचा फटका बसला. आगामी काळात एकापेक्षा जास्त विरोधी पक्ष असलेल्या राज्यांमध्ये अधिक सक्षम राजकारण करण्याची गरज असून, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व याबाबत विचार करतील.’





