“काँग्रेस रामाच्या विरोधात…”; ‘रामनगर’चे नाव बदलल्याने भाजपची कर्नाटक सरकारवर टीका

Prahlad Joshi | कर्नाटक सरकारने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून दक्षिण बंगळुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मंजुरी कर्नाटकच्या मंत्रिमंडळानं दिली आहे. कर्नाटकच्या दक्षिणेकडे तामिळनाडू सीमेवर रामनगर नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला लागूनच बंगळुरू शहर व बंगळुरू ग्रामीण हे दोन जिल्हे आहेत. त्यानुसार रामनगर या जिल्ह्याचं नामकरण बदलून बंगळुरू साऊथ असं करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. त्यानुसार कर्नाटक सरकारनं मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
मंत्री एच.के. पाटील यांनी केले स्पष्ट
कर्नाटकचे कायदा मंत्री एच.के. पाटील म्हणाले, “लोकांच्या मागणीनंतर राज्य मंत्रिमंडळाने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण असे करण्यास मान्यता दिली आहे. बेंगळुरू ब्रँड लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.” मंत्री एच.के.पाटील यांनी हा बदल केवळ जिल्ह्याच्या नावाशी संबंधित असून कोणत्याही गटात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
#WATCH | Karnataka cabinet has approved to rename Ramanagara district to Bengaluru South district.
Union Minister and BJP MP Pralhad Joshi says, “…This shows their allergy towards Ram and Ram Mandir, even to the name of Ram. They are quite allergic. They used to do it while… pic.twitter.com/eJvJ9Dj2IR
— ANI (@ANI) July 26, 2024
भारतीय जनता पक्ष आणि जेडीएसचा विरोध
रामनगरमधील रिअल इस्टेट वाढवण्याच्या उद्देशाने हे नाव बदलण्यात आल्याचे सांगत भारतीय जनता पक्ष आणि जेडीएसने याला विरोध केला. अशा निर्णयांमुळे विकास होणार नसल्याचे देखील म्हंटले आहे. या निर्णयानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधला.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार प्रल्हाद जोशी म्हणाले की, ‘काँग्रेसला राम नावाची आणि राम मंदिराची अॅलर्जी आहे, त्यामुळेच त्यांनी रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधले जात होते, तेव्हाही तेच करत होते. आता रामनगरचे नाव बदलण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसने रामाच्या विरोधात असल्याचे सिद्ध केले आहे.’
पुढे ते म्हणाले, “जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी कोणीही केली नव्हते, ‘फक्त व्होट बँकेच्या राजकारणासाठी नाव बदलण्यात आले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा भाजप आंदोलन करेल, असा इशाराही प्रल्हाद जोशी यांनी दिला.
दरम्यान, रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण करण्याच्या प्रस्तावाला वेग धरला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रामनगर जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत. त्यात रामनगर, चन्नापटना, मागाडी, कनकपूर आणि हरोहळ्ळी या तालुक्यांचा समावेश आहे.
हेही वाचा:





