Maharashtra Politics : राज्यात भाजपला मोठं खिंडार; शहराध्यक्षांसह संपूर्ण शहर कार्यकारिणीचा राजीनामा
Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच, कोकणात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून शहराध्यक्षांसह संपूर्ण शहर कार्यकारिणीने आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजीमुळे हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Politics)
सावंतवाडीच्या भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी आपल्या संपूर्ण कार्यकारिणीसह पदाचा राजीनामा दिला. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दबावामुळे आणि अंतर्गत राजकारणामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
पत्रकार परिषदेत बोलताना मोहिनी मडगावकर यांनी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले. आपल्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी कट रचला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
मडगावकर म्हणाल्या की, शहराध्यक्ष म्हणून कामकाज थांबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यामागील कारण स्पष्ट करण्यात आले नाही. आपल्या कार्यकारिणीतील कोणत्याही पदाधिकाऱ्याशी चर्चा न करता निर्णय घेतले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली होती. (Maharashtra Politics)
“आता मी पक्षाची सामान्य कार्यकर्ती म्हणून काम करेन. माझ्या जागी पक्षाला ज्याला जबाबदारी द्यायची असेल त्याला द्यावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्या विरोधातील राजकारणामागे महेश सारंग यांची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Maharashtra Politics)
दरम्यान, सिंधुदुर्गमधील सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगर परिषदांमध्ये भाजपचे वर्चस्व असताना अशा प्रकारे संपूर्ण शहर कार्यकारिणीने राजीनामा दिल्याने पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींमुळे भाजपच्या संघटनात्मक एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Maharashtra Politics)





