Delhi Election 2025 : भाजपने केजरीवालांना म्हटले ‘इलेक्टोरल हिंदू’; दिल्लीतील पोस्टरबाजी चर्चेत !

Delhi Election 2025 – दिल्ली निवडणूक जाहीर होण्याआधीच राजधानीत निवडणूकीचे वातावरण तयार झाले आहे. आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर भाजप आणि आप मध्ये पोस्टर वॉर बघायला मिळत आहे. दिल्ली भाजपने मंगळवारी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर जारी केले. पोस्टरमध्ये केजरीवाल यांचे इलेक्टोरल हिंदू (चुनावी हिंदू) असे वर्णन करण्यात आले आहे.
पुजारी आणि ग्रंथी सन्मान योजनेबाबत भाजपने केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोमवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुजारी आणि ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली. त्या पाश्र्वभूमीवर भाजपकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
दिल्ली भारतीय जनता पक्षाने मंगळवारी माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांना टोमणे मारणारे पोस्टर जारी केले. या पोस्टरमध्ये केजरीवाल यांचे इलेक्टोरल हिंदू असे वर्णन करण्यात आले आहे. भाजपच्या या पोस्टरला आपने प्रत्युत्तर दिले.
दिल्ली भाजपच्या एक्स वर रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अरविंद केजरीवाल रुद्राक्षाच्या माळासोबत फुलांचा माळा घातलेले दिसत आहेत. पोस्टरमध्ये लिहिले आहे- चुनावी हिंदू. या पोस्टरच्या पार्श्वभूमीवर घंटा दिसत आहेत. पोस्टरमध्ये खाली लिहिले आहे – मंदिरात जाणे हा माझ्यासाठी फक्त एक भ्रम आहे, पुरोहितांचा आदर करणे हा माझा निवडणूक कार्यक्रम आहे, मी नेहमीच सनातन धर्माची खिल्ली उडवली आहे.
याशिवाय, सोशल मीडियावरील पोस्टरसह, भाजपने लिहिले की केजरीवाल, निवडणूक हिंदू, ज्यानी 10 वर्षे इमामांना पगार वाटून ठेवला, जे स्वतः भगवान श्री राम मंदिराच्या बांधकामावर खूश नव्हते. ज्यांचे संपूर्ण राजकारण हिंदूविरोधी होते? आता निवडणुका आल्या की त्यांना पुजारी-पुरोहितांची आठवण झाली का?, असा आरोप भाजप प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी केला आहे.





