Bipasha Basu | Race 4 : बॉलिवूड अभिनेत्री ‘बिपाशा बसू’ बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अलिकडेच बिपाशाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर ‘रेस’ चित्रपटाशी संबंधित एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून बिपाशाने चाहत्यांच्या मनात नवीन उत्सुकता निर्माण केली आहे. अभिनेत्री लवकरच कोणत्या सिनेमात झळकणार? असा सवाल चाहते करत आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘रेस’ सिनेमात अभिनेत्री बिपाशा बसू सैफ अली खानसोबत दिसली होती. अलिकडेच ‘रेस ४’ बद्दल बरीच चर्चा रंगली असताना बिपाशाने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे बिपाशा नेमकं काय सांगू इच्छिते? बिपाशा ‘रेस ४’ चित्रपटाचा भाग होणार का? याचे संकेत दिसून लागले आहेत. बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्राम पेजच्या स्टोरी सेक्शनमध्ये ‘रेस’ चित्रपटातील ‘रेस सॅन्सन की…’ हे गाणे शेअर केले आहे. या गाण्यात ती नाचत आहे आणि कतरिना कैफ देखील त्यात दिसत आहे. बिपाशाला हे गाणं पुन्हा एकदा का आठवतंय? बिपाशाने याबद्दल कोणतेही कॅप्शन किंवा संदेश लिहिलेला नाही. असे दिसते की ती ‘रेस ४’ चित्रपटाच्या निर्मात्यांना एक इशारा देऊ इच्छिते. आणि आपण देखील या सिनेमाचा एक भाग असल्याचं अभिनेत्री सांगताना दिसत आहे. मात्र, आता लवकरच अभिनेत्रीच्या या सस्पेन्सवरून पडदा उठण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘रेस (२००८)’ चित्रपटात बिपाशा बसूने सोनियाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सैफ अली खान, अक्षय खन्ना, कतरिना कैफ, अनिल कपूर हे कलाकार होते. अलिकडेच अशी बातमी आली होती की ‘रेस ४’ मध्ये एक नवीन एन्ट्री होणार आहे. निर्मात्यांनी असेही पुष्टी केली की सैफ अली खान व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा देखील चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी इतर कोणत्याही अभिनेत्याचे नाव फायनल केलेले नाही. बिपाशा बऱ्याच दिवसांपासून ब्रेकवर : बिपाशा बसूबद्दल बोलायचे झाले तर, करण ग्रोव्हरशी लग्न केल्यापासून ती चित्रपटांमध्ये कमी दिसू लागली आहे. मुलगी देवीच्या जन्मानंतर ती चित्रपटांमध्ये दिसली नाही. ‘रेस’ चित्रपटातील गाणे शेअर करून, बिपाशा पुन्हा चित्रपटांमध्ये परतण्याचा विचार करत असेल अशी शक्यता आहे. अभिनेत्री बिपाशा बसूने तिच्या कारकिर्दीत ‘अजनबी’, ‘राज’, ‘जिस्म’ अलोन, ‘नो एंट्री’, ‘फूटपाथ’, ‘अपहरण’, ‘बचना ए हसीनो’ अशा अनेक वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा ग्लॅमरस स्टाईल बहुतेक चित्रपटांमध्ये दिसला, जो प्रेक्षकांनाही आवडला आहे.