Bipasha Basu : करण जोहरने होस्ट केलेला ‘द ट्रेटर्स इंडिया’चा पहिला सीझन प्रचंड यशस्वी ठरला. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने या वर्षीच्या कार्यक्रमांच्या घोषणेदरम्यान ‘द ट्रेटर्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. करण जोहर आता लवकरच या रिॲलिटी शोच्या दुसऱ्या सीझनचे चित्रीकरण सुरू करणार आहे. ‘द ट्रेटर्स’च्या नवीन सीझनसाठी अनेक स्पर्धकांची नावे समोर येत आहेत, ज्यात अभिनेत्री बिपाशा बसूचे नावाची चर्चा आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिपाशा बसूने करण जोहरच्या शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर नाकारली आहे. शोच्या घोषणेपासून बिपाशा बसू या सीझनचा भाग असू शकते अशा अफवा पसरवल्या जात होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिपाशा बसूने ही ऑफर नाकारली आहे. बिपाशा सध्या कोणत्याही रिॲलिटी शोमध्ये सहभागी होण्याच्या मनःस्थितीत नाही आणि तिने ही गोष्ट टीमला स्पष्टपणे कळवली आहे. तिची मुलगी देवीच्या जन्मानंतर बिपाशा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे, या कारणामुळे तिने शोमध्ये सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाची अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा ‘द ट्रेटर्स’मध्ये दिसणार दरम्यान, करण जोहरच्या शोच्या दुसऱ्या सीझनमधील प्रमुख स्पर्धकांच्या नावांबद्दल बोलायचे झाल्यास नेहा धुपिया आणि क्रिस्टल डिसूझा यांची नावे निश्चित मानली जात आहेत. या दोन्ही अभिनेत्री यावेळी शोचा भाग असणार आहेत. संजय कपूर देखील ‘द ट्रेटर्स’मध्ये दिसू शकतात. इतर चर्चेत असलेल्या नावांमध्ये श्वेता तिवारी, मुनवर फारुकी, एल्विश यादव, रुबिना दिलैक आणि मल्लिका शेरावत यांचा समावेश आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप अधिकृत स्पर्धकांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. उर्फी जावेद आणि निकिता लुथर यांनी ‘द ट्रेटर्स’चा पहिला सीझन जिंकला होता. त्यांच्या अचुक रणनीतीचे आणि खेळाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. यंदाचे या शोचे स्वरूप ‘देशद्रोही विरुद्ध निर्दोष’ यावर आधारित आहे, जिथे स्पर्धकांना बुद्धिमत्ता, चातुर्य आणि विश्वास यांचा समतोल साधावा लागणार आहे. हेही वाचा : Last day of the Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुपारी पत्रकार परिषद