Bipasha Basu : ९ वर्ष रिलेशन, दोघांमध्ये बिनसलं अन् नात्याचा THE END; बिपाशाने इतक्या वर्षांनी सांगितलं नैराश्याचं कारण

Bipasha Basu : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून बिपाशा बसूकडे पाहिले जाते. तिने आजवर अनेक दर्जेदार सिनेमांमधून प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. तिने राज नावाच्या हिंदी सिनेमातून बॅालिवूडमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या पहिल्याच सिनेमाने तिला घवघवीत यश मिळवून दिलं.
त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. मात्र, काही काळ बॅालिवूडपासून बिपाशा अलिप्त राहिली होती. त्याच नेमंक कारण काय होतं आता ते समोर आलं आहे. अभिनेत्री बिपाशा बसूच्या आयुष्यात असा एक क्षण आला होता की त्यामुळे ती नैराश्याच्या खाईत लोटली गेली होती.
सध्या अभिनेत्री बिपाशा बसू तिच्या कुटुंबामुळे बॅालिवूडपासून अलिप्त आहे. मात्र, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत सक्रीय असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असते. पण जेव्हा बिपाशा तिच्या करिअरच्या शिखरावर पोहचली होती, तेव्हा तिने सिनेमे करणे थांबवले होते. त्या वेळी अभिनेत्रीला मोठा धक्का बसला होता आणि ती शॉकमध्ये गेली होती.
बिपाशाचे करणसोबत लग्न होण्यापूर्वी तिचे प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमसोबत प्रेमसंबंध होते. पण काही कारणामुळे दोघांचं ब्रेकअप झालं, याचा मोठा धक्का बिपाशासाठी बसला होता. जॉन अब्राहम आणि बिपाशा बसूने २००३ मध्ये ‘जिस्म’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. तब्बल ९ वर्ष त्यांचे प्रेमसंबंध टिकले. २०१४ मध्ये जॉन आणि बिपाशाचं ब्रेकअप झालं.
“या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी मला अनेक महिने लागले. जॉनसोबतचे माझे नाते तुटले आहे यावर विश्वास ठेवणे मला कठीण झाले.” असा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे. बिपाशाने मुलाखतीत असेही म्हटले आहे की जॉनसाठी तिने सर्वस्व सोडले होते. तिने लोकांना भेटणे आणि सिनेमे करणे देखील बंद केले होते.
हेही वाचा: “मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही?” ; उद्धव ठाकरे म्हणाले….





