बिहारच्या मंत्र्याचे विधान चर्चेत,’बेकायदेशीर बंदूक बाळगणाऱ्या गुन्हेगाराला जागीच गोळ्या घालणार…’

Bihar Government । बिहारचे मंत्री दिलीप जैस्वाल यांचे विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. दिलीप जैस्वाल यांनी जनतेला संबोधित करतांना बिहार सरकारचे नियम सांगितले. ते म्हणाले, ‘जो गुन्हेगार बेकायदेशीर बंदुकीच्या गोळ्या घेऊन रस्त्यावर फिरतो, त्याला थेट गोळ्या घातल्या जातील. असे शासनाचे आदेश असल्याचे सांगितलं सध्या त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमका काय म्हणाले,’बिहारचे मंत्री दिलीप जैस्वाल’
‘बिहार सरकारने निर्णय घेतला आहे की,’राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एसआयटी पोलिस दल तयार केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पोलिस दल असेल. ते म्हणाले की, जो गुन्हेगार बेकायदेशीर बंदुकीच्या गोळ्या घेऊन रस्त्यावर फिरतो, त्याला थेट गोळ्या घातल्या जातील, असे शासनाचे आदेश देण्यात आले आहे .
मंत्री दिलीप जैस्वाल म्हणाले की, ‘आता राज्यात कुठेही गुन्हेगार राहणार नाही. बंदूक बाळगणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराचा जागीच मारण्यात येणार आहे. बिहार सरकारने मंत्रिमंडळात हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता बिहारमध्ये गरीब अन् श्रीमंत राज्य करतील. गोळ्या घालणारे गुन्हेगार राज्य करणार नाहीत.’
मंत्री जयस्वाल यांनी मंचावरून लोकांमध्ये सांगितले की, ‘बिहार सरकार सर्वांची चिंता करत आहे. जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘जर कोणी तुमची चिंता करू शकत असेल तर मुख्यमंत्री नितीशकुमार करू शकतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. त्यामुळे कोणाच्याही फंदात पडू नका. कोणीही आले तरी कोणाच्याही फंदात पडू नका.’ असेही ते म्हणाले आहे.





