आजच्या मतदानातील हे आहेत महत्त्वाचे मुद्दे

बिहार विधानसभेच्या 243 पैकी 71 जागांसाठी मतदान आज बुधवार, दि. 278 ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामधील हे मुद्दे दुर्लक्षून चालणार नाही.
1. आज ज्या 71 जागांवर मतदान होत आहे, तिथे वर्ष 2010 मध्ये सर्वाधिक विजयी उमेदवार लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे होते. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाला मिळून जेवढ्या जागा मिळाल्या होत्या, त्यापेक्षा जास्त जागा राजदने मिळवल्या होत्या. एका अर्थी या जागा म्हणजे राजदचा बालेकिल्ला मानल्या जातात.
2. नेहमी एका मतदान केंद्रावर 1600 मतदारांचे मतदान असते. मात्र यावेळी कोव्हिडमुळे प्रत्येक केंद्रावर एक हजारच मतदार मतदान करु शकतील. 80 वर्षांवरील नागरिकांना टपाली मतदान करण्यास सांगण्यात आले आहे. मतदानाची वेळही वाढवण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर सॅनिटायझर फवारले जात आहे.
3. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरजेडी आणि बीजेपीमधील वाढते अंतर स्पष्ट झाले. मित्र पक्ष असले तरी, बीजेपीच्या सुशिल मोदी आणि रवीशंकर प्रसाद यांच्याखेरीज कोणीही जेडीयुचा प्रचार केला नाही. तसेच दोन्ही पक्षांच्या प्रचार साहित्यांत मित्र पक्षांच्या नेत्यांचे चेहरेही दिसले नाहीत.
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्यासह तीनही सभांमध्ये नितीशकुमार यांचा ओझरता उल्लेख करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी मतदान करण्याचे आवाहन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
5. तेजस्वी यादव यांच्या मित्र पक्षांपैकी कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे कधीही एकत्रित प्रचार करताना दिसले नाहीत. तेजस्वी यांनी बेरोजगारीच्या मुद्यावर मते मागितली. मात्र वडील लालूप्रसाद यांच्याप्रमाणे त्यांनी जातीय मुद्यावर मते मागणे टाळले.
6. अन्य प्रतिस्पर्धी लोक जन शक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली; मात्र भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. भाजपाने जरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्रीओअदाचे उमेदवार असतील, असे सांगितले, तरी त्यावर पासवान यांनी टीका केली नाही.





