‘बिग बॉस ओटीटी ३’ची विजेती सना मकबूल रुग्णालयात दाखल

Sana Makbul | ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन ३ ची विजेती सना मकबूलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती बिघडल्याने तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सनाच्या मैत्रिणीने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या स्टोरीत ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. यानंतर चाहत्यांनी देखील तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सना मकबूलच्या मैत्रिणीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझी सुंदर आणि सर्वात मजबूत मैत्रीण, मला अभिमान आहे की तू इतक्या गंभीर परिस्थितीतही धैर्य दाखवत आहेस आणि खंबीरपणे उभी आहेस. इन्शा अल्लाह, तू या आजाराशी लढशील आणि पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होऊन परत येशील. अल्लाह तुझ्यासोबत आहे. मीही नेहमीच तुझ्यासोबत आहे. तू लवकरच बरी होशील.” Sana Makbul |
याधीच सना मकबूलने ऑटोइम्युन हेपाटायटिस लिव्हरशी संबंधित रोगाने त्रस्त असल्याचे सांगितले होते. २०२० पासून तिचा हा आजार सुरू असल्याचे आणि तिच्या शरीरातील इम्यून सेल्यूल्सने आपल्या लिव्हरवर हल्ला करत असल्याचे तिने भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये सांगितले होते. त्या वेळी सीनियर्स्टेरॉइड्स, इम्यूनोसप्रेसंट्स आणि वेगन आहारामुळे इलाज सुरू असल्याचेही स्पष्ट केले होते. तसेच माझं काम नीट सुरू असताना मला प्रकृतीकडे लक्ष देण्याकरिता कामातून ब्रेक घ्यावा लागत आहे. मी माझ्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करत असल्याचेही तिने सांगितले होते. Sana Makbul |
सनाच्या कामाबद्दल बोलायचं झाल तर, ती ‘विष’ या मालिकेत दिसली होती. यानंतर २०२१ साली ती ‘खतरों के खिलाडी’मध्ये झळकली होती. तिने २०२४ साली ‘दिक्कुलु चुडाकु रामय्या’ या तामिळ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. याशिवाय ती ओटीटीवरील ‘बिग बॉस ओटीटी’च्या ३ पर्वाची विजेती ठरल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. Sana Makbul |
हेही वाचा:
नारायण राणेंनी धमकी दिल्याचा आरोप अन् प्रकाश महाजनांनी दिले खुलं आव्हान, म्हणाले…





