‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेचा साखरपुडा सोहळा संपन्न; फोटो व्हायरल

Jay Dudhane Engagement | ‘बिग बॉस मराठी सीझन ३‘मधील अभिनेता जय दुधाणे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. जयने त्याची मैत्रीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्यासोबत साखरपुडा केला आहे.
जय आणि हर्षला यांच्या कुटुंबियांच्या तसंच मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा साखरपुडा सोहळा पार पडला. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. जय दुधाणेने साखरपुड्यासाठी काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता. तर हर्षलाने लेहंगा परिधान केला आहे. आता चाहते दोघांची लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. Jay Dudhane Engagement |
View this post on Instagram
जयनं मार्च महिन्यात त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून खास फोटो शेअर करत चाहत्यांना प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. उत्तराखंडमधील मसुरी इथल्या निसर्गरम्य डोंगरदऱ्यांच्या साक्षीनं जयनं हर्षलाला अत्यंत रोमँटिक आणि फिल्मी स्टाईलनं प्रपोज केलं होतं. गुडघ्यावर बसून अंगठी घालत त्यानं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. Jay Dudhane Engagement |
जय हा MTV स्प्लिट्सविला १३ मध्ये झळकला होता. यानंतर बिग बॉस मराठी ३ या शोमध्ये तो उपविजेता ठरला. यानंतर त्यानं ‘वेड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत आणि ‘गडद अंधार’ सारख्या चित्रपटांत काम केलं आहे. लवकरच तो महेश मांजरेकर यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटातही दिसणार आहे. तर जयची होणारी पत्नी हर्षला पाटील ही एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आणि व्हिडीओ इन्फ्लुएन्सर आहेती तिच्या फॅशन आणि ट्रॅव्हल संदर्भातील व्हिडिओंसाठी ओळखली जाते. Jay Dudhane Engagement |
हेही वाचा:
पक्षानेच शक्ती कमी केली म्हणणारे सुधीर मुनगंटीवारांनी CM फडणवीसांची घेतली भेट; नेमकी काय चर्चा झाली?





