अभिनेता जय दुधाणेने दिली प्रेमाची कबुली; गर्लफ्रेंडसह शेअर केले रोमँटिक फोटो

Bigg Boss Marathi Fame Actor | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनमधील अभिनेता जय दुधाणेने प्रेमाची कबुली दिली आहे. जयने सोशल मीडियावर गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. जय अलीकडेच उत्तराखंडमध्ये मसुरी येथे फिरायला गेला होता. तेथे त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज केले. या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर त्याने शेअर केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जय लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर असलेल्या हर्षला पाटील हिला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. अखेर या दोघांनीही ड्रीम प्रपोजलचे फोटो शेअर करत त्यांचं रिलेशनशिप अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. जय व हर्षला यांच्या रोमँटिक पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, Splitsvilla च्या १३ व्या पर्वाचा जय विजेता ठरला होता. त्याने हा शो अदिती राजपूतबरोबर जिंकला होता. यानंतर अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात प्रवेश घेतला. या पर्वाचा जय उपविजेता ठरला. याशिवाय ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत सुद्धा त्याने काम केलं होतं. Bigg Boss Marathi Fame Actor |
या मालिकेत अभिनेता विशाल निकम, जय दुधाणे आणि अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत होते. यात तो इन्स्पेक्टर घोरपडेची भूमिका साकारत होता. मात्र वैयक्तिक कारणास्तव जयने मालिका सोडली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल त्याने सांगितलं होते. Bigg Boss Marathi Fame Actor |
हेही वाचा:





