बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री झाली आई; लेकीचे नावही ठेवले खास

Sharmishtha Raut | बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आई झाली आहे. लग्नानंतर ४ वर्षांनी शर्मिष्ठाच्या घरी पाळणा हलला. तिला कन्यारत्न प्राप्त झाली आहे. नुकतेच तिच्या लेकीचे बारसं पार पडलं. यावेळी अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. सध्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बारशाला शर्मिष्ठा आणि तिचा पती तेजस देसाईने खास लुक केला होता. दोघांचाही पारंपरिक अंदाज यावेळी पाहायला मिळाला. शर्मिष्ठाने पांढऱ्या आणि लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर तेजसने त्याच रंगाचा कुर्ता, धोती, पैठणीचं लाल रंगाचं जॅकेट परिधान केले होते. शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या लेकीच्या बारश्याच्या सोहळ्यातील व्हिडिओ समोर आले आहेत. यावर चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
View this post on Instagram
लेकीचे नाव आणि अर्थ
शर्मिष्ठा राऊतने तिच्या लेकीचे नाव ‘रुंजी’ असे ठेवले आहे. ‘रुंजी’ च्या नावाचा अर्थ स्पष्ट करत शर्मिष्ठा म्हणाली, “‘रुंजी’ म्हणजे अकस्मात सुंदर होय तर दुसरा अर्थ असा की, मनात सतत घोळत राहणे. एकदा तुम्ही रुंजीला पाहिलात आणि तिच्याशी संवाद साधलात तर तुमच्या मनातून जाणार नाही. ” Sharmishtha Raut |
View this post on Instagram
2020 मध्ये शर्मिष्ठा आणि तेजस लग्नबंधनात अडकले. आता दोघेही आईबाबा झाले असून त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. Sharmishtha Raut |
हेही वाचा :





