ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् योगेश कदमांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले “भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील”

Yogesh Kadam | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यादृष्टीने दोन्ही ठाकरे बंधूंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने युतीसाठी राज ठाकरेंना अटी घातल्या आहेत.
राज ठाकरेंनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छुपा पाठिंबा देऊ नये, अशी अट उद्धव ठाकरेंनी ठेवली आहे. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर अनेक राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे.
सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला –
उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे.स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना
रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे. याशिवाय शिवसेनेचे पहिल्या…— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) April 20, 2025
उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ‘वापरा आणि फेकून द्या’ – योगेश कदम
“सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला. उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे. स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे”, असं योगेश कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. Yogesh Kadam|
पुढे त्यांनी म्हंटले की, “शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते नारायणजी राणे, स्व.मनोहरजी जोशी, दिवाकरजी रावते, लीलाधर डाके, रामदासभाई कदम आणि एकनाथजी शिंदे यांना सुद्धा गरज सरो नी वैद्य मरो प्रमाणे कसे डावलले हे वेगळ्याने सांगायला नको. त्यामुळे आपुलकीचा एकच सल्ला देतो – जरा जपून, आपण मनापासून हात पुढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील,” असा सल्ला योगेश कदम यांनी राज ठाकरे यांना ट्वीटद्वारे दिला आहे. Yogesh Kadam |
नेमकी का होतेयं ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा?
राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उत्तर दिले होते. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, “आमच्यातील भांडणे फार किरकोळ आहे. एकत्र येणे, एकत्र राहणे हे कठीण नाही.” राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठाच्या कामगार मेळाव्यातून राज ठाकरे यांच्या प्रस्तावास प्रतिसाद दिला होता.
भाजप आणि शिंदे सेनेसोबत संबंध तोडण्याची अट उद्धव ठाकरे यांनी घातली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवल्याने चर्चांना उधाण आले आहे. Yogesh Kadam |
हेही वाचा:
राज्यात उकाडा वाढला; चंद्रपूरचे तापमान ४४ अंशावर, नागरिक हैराण





