Sadik Babu Kapur : ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अपक्ष उमेदवाराने सततच्या त्रासाला कंटाळून आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हडपसरमधील अपक्ष उमेदवार सादिक उर्फ बाबू कपूर (वय ५६) यांनी आत्महत्या केली असून, एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक उर्फ बाबू कपूर याची वैयक्तिक वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, यावरुन निवडणुकीच्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे आरोपात किती तथ्य आहे याचा सखोल तपास केला जाणार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सादिक उर्फ बाबू कपूर (वय 56) याने त्याच्या कार्यालयात आत्महत्या केली. सादिकने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हाताच्या पंजावर काहीतरी मजकूर लिहला होता. तसेच त्याने एकूण 30 पानांची सुसाईड नोट लिहली असून त्यामध्ये आपण आत्महत्या का केली, याचे सविस्तर कारण नमूद केले आहे. या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख आहे. पुण्यातील सय्यद नगर भागात पाच गुंठे जमीन होती. या जमिनीच्या वादातून फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यात सतत वाद सुरु होता. त्याच वादातून आणि सततच्या त्रासाला कंटाळून सादिक यांनी आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमध्ये अनेक व्यक्तींची नावं सादिक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक व्यक्तींची नावं आहेत. त्यामुळे या प्रकरणात कोणती माहिती समोर येते पाहणे लागणार आहे. दरम्यान, आत्महत्या केलेला सादिक उर्फ बाबू कपूर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई झाली होती. ऐन महापालिका निवडणुकीत घडलेल्या या घटनेने राजकारण तापणार असल्याचे बोलले जात आहे. हेही वाचा : “मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार”; CM फडणवीसांची मोठी घोषणा, ठाकरे बंधूंवर झोंबणारी टीका म्हणाले…