Bigg Boss Marathi 5: ‘हे जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही…’; भाऊच्या धक्क्यावर रितेशने वैभवला सुनावलं

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. “आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका”, असं म्हणत भाऊच्या धक्क्यावर रितेश वैभव चव्हाणची हजेरी घेताना दिसणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात रितेश म्हणतोय,”बॉर्डरवरचा सैनिक समोरच्या सैनिकावर गोळ्या झाडण्यापेक्षा आपल्या सैनिकावर गोळ्या झाडतो याला काय म्हणतात?”.
त्यावर घरातील सदस्य फितूर, शत्रू, धोकेबाज, गद्दार असं म्हणतात. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या टास्कमध्ये वैभवने गद्दारी केलेली दिसून आली आहे. त्यामुळे रितेशने त्याची चांगलीच हजेरी घेतली आहे.
View this post on Instagram
रितेश वैभवला म्हणतो,”बोलायला जिगर लागते. ही जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. ही जिगर तुमच्यात दिसत नाही. इथून पुढे तुमच्यावर कोणी विश्वास का ठेवायचा.
तुमच्या आत आहे तेच बाहेर दिसणार आहे. प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झालाय..मला बघायचंय ही मैत्री कधीपर्यंत टिकते. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलंय गद्दार म्हणून बाहेर पडू नका”. असं म्हणतात दिसतात.
यंदाचा बिग बॉसचा आठवडा घरातील सदस्यांनी चांगलाच गाजवला आहे. राडा, भांडण आणि भावनिक प्रेम हे सर्वच रंग यंदाच्या आठवड्यात पाहायला मिळाले आहे.
… अन् सुरज म्हणाला,’ट्रॉफी तर मीच नेणार..यांना कुणाला हाथ लावू देणार नाही’





