Bigg Boss Marathi 5: ‘निक्की तुम्ही चावीचं माकड…’; भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला सुनावलं, पाहा Video

Bigg Boss Marathi 5 | Nikki Tamboli: ‘बिग बॉस मराठी’च्या घराची चौथ्या आठवड्याची निक्की कॅप्टन झाली आहे. खरंतर हे कॅप्टनसीपद निक्कीकडे अरबाजमुळे आलं. पण कॅप्टन पद मिळाल्यानंतर निक्कीचं एक वेगळचं रूप पाहायला मिळालं. निक्कीने कॅप्टनसीचा चुकीचा वापर केला. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशने कॅप्टन निक्कीची चांगलीच शाळा घेतली आहे.
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख निक्कीला चांगलच सुनावताना दिसणार आहे. रितेश भाऊ म्हणतोय,”निक्की तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धीदेखील हलकीच आहे. तुम्हालाना या घरातले चावी मारतात…मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका”.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’चा हा गेम डोक्याने खेळण्याचा आहे. रितेश भाऊ दर आठवड्याला सदस्यांची हजेरी घेताना दिसून येतो. या आठवड्यातही तो सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येणार आहे.
‘तुम्ही बिग बॉसच्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात’; रितेशने जान्हवीला दाखवली जागा
‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात जान्हवी पॅडी यांना म्हणाली होती,”आयुष्यभर अॅक्टिंग केली आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करताय”. त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,”जान्हवी तुम्ही ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात.
कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावं याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात…तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे”.
रितेश भाऊ पुढे म्हणाला,”तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं.
जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे.
हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते. लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो”.





