Bigg Boss Marathi 5 : मेघा धाडे संतापली; म्हणाली “आगाऊ कार्टी जान्हवी…”

Bigg Boss Marathi 5 | ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यानंतर आता घरात दोन गट पडले असून स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील वाद चांगलेच चर्चेत राहिला. यावरून अनेकांनी निक्कीवर टीका केली. त्यानंतर आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये जान्हवी आणि वर्षा उसगांवकरांमध्ये टोकाचे वाद झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच काय तर जान्हवीने वर्षा उसगांवकरांच्या पुरस्कारांबाबत वादग्रस्त विधान केले.
यानंतर आता ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने या प्रकणावर संतप्त पोस्ट लिहिली आहे. ती लिहिते की, “माझ्या लाडक्या ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका. तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा. ही माझी कळकळीची विनंती आहे. ‘बिग बॉस मराठी’ची सर्वांत वाईट स्पर्धक जान्हवी किल्लेकर आहे.” Bigg Boss Marathi 5 |
आणखी एका पोस्टमध्ये तिने लिहिले कीम “मला अजूनही आठवते की, हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा आणि स्वामी ओम यांना ‘बिग बॉस’च्या घरातून त्यांनी केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल बाहेर काढलं होतं. आता आम्हाला रितेश देशमुख सरांकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे. तुम्ही याबद्दल नक्की काहीतरी बोला. काही स्पर्धकांप्रती जान्हवी किल्लेकरचं असं वागणं अत्यंत चुकीचं आहे. रितेश सर, प्लीज तिला बाहेर हाकलून द्या, आम्हाला असे लोक घरात नको आहेत. ही माझी कळकळीची विनंती आहे.” ही पोस्ट मेघा धाडेने ‘कलर्स मराठी’, ‘बिग बॉस’ आणि रितेश देशमुखला टॅग केली आहे. Bigg Boss Marathi 5 |
दरम्यान, जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरात केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर नाराजी पसरली आहे. “ही फाल्तूची ओव्हरअॅक्टिंग नका करू, त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत…पण, तुम्हाला दिलाय.” असं वक्तव्य जान्हवीने वर्षा उसगावकर यांच्याबाबत केल्याने नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा:







