“आपल्या बारामतीचा…”; सुप्रिया सुळेंकडून सुरज चव्हाणच कौतुक, नेमकं काय म्हणाल्या? पाहा…

Supriya Sule । Bigg Boss Marathi 5 । Suraj Chavan : महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता मिळाला. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता. तर अभिजीत सावंतने पटकावले दुसरे स्थान. सूरजला 14 लाख 60 हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी.
खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वत:चं वेगळेपण दाखवलं.
त्याने वाद घातले, राडे केले. पण त्याहीवेळी त्याने स्वत:ची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला.
दरम्यान, चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या विजेता ‘सुरज चव्हाणला’ शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला.
कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व… pic.twitter.com/GER9YtVXSF
— Supriya Sule (@supriya_sule) October 6, 2024
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो. या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
महाविजेता सूरज चव्हाण म्हणाला….
‘बिग बॉस मराठी’च्या या गाजलेल्या पर्वाचा महाविजेता सूरज चव्हाण म्हणाला,”हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी… माझं स्वप्न पूर्ण झालंआहे. बिग बॉस मराठी’साठी विचारणा होताच मी लगेचच होकार दिला होता. या घराने मला अनेक गोष्टी शिकवल्या.
एक चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला. प्रेक्षकांना मी भावलो. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच ‘बिग बॉस मराठी’चा मी महाविजेता ठरलोय. सर्वच प्रेक्षकांचे मनापासून खूप-खूप आभार. या मंचाने मला खूप काही दिलंय. मी आयुष्यभर प्रेक्षकांचा ऋणी राहीन”.





