वालावलकरांचो थोरलो जावई! अंकिता आणि कुणालचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

Ankita Walawalkar Wedding | ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता वालावलकरच्या अखेर विवाहबंधनात अडकली आहे. कोकणात आपल्या गावी अंकिताचा लग्न समारंभ पार पाडला. मागील काही दिवसांपासून अंकिताच्या घरी लगीनघाई सुरू होती. अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा साखरपुडा, मेहंदी, हळद आणि संगीत अशा लग्नाआधीच्या विधीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर अंकिताने वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
गेल्यावर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने कुणालबरोबरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर ‘कोकण हार्टेड गर्ल’चे सगळे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
अंकिताचा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने कोकणात लक्ष्मीनारायण मंदिरात पार पडला. अंकिताने लग्नात पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, मुंडावळ्या, गळ्यात मोठा नेकलेस असा लूक ‘कोकण हार्टेड गर्ल’ने विवाहसोहळ्यात केला होता. तर, तिचा पती कुणाल भगतने सुद्धा लग्नात मराठमोळा लूक केला होता.
View this post on Instagram
अंकिताने लग्नाचे फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. अंकिताने लिहिलं की, “वालावलकरांचो थोरलो जावई! कुणाल तुला मी बायको म्हणून मिळाली, यासाठी तुझं खूप अभिनंदन! तू खूप लकी आहेस.” सध्या अंकिता आणि कुणालवर कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Ankita Walawalkar Wedding |
दरम्यान, अंकिता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाली होती. अंकिताचा नवरा कुणाल भगत हा मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय संगीतकार आहे. ‘येक नंबर’ या सिनेमासाठी कुणालने संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांना देखील त्याने संगीत दिलं आहे.
हेही वाचा:
Delhi Earthquake : भूकंप होण्यामागची नेमकी कारणं काय? अशा स्थितीत काय काळजी घ्यावी?





