Bigg Boss Marathi 5: ‘छोटा पुढारी’च्या पंग्यामुळे घरात झाला दंगा ! अंकिताची थेट कानाखाली लगावण्याची भाषा, पाहा Video

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. हे चिमुकले पाहुणे घरातील सर्व सदस्यांना आपल्या तालावर नाचवताना दिसत आहेत. चिमुकल्या पाहुण्यांसोबत घरातील ‘छोटा पुढारी’देखील सगळ्यांशी पंगा घेताना दिसत आहे.
‘छोटा पुढारी’च्या पंग्यामुळे घरात चांगलाच दंगा होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता आणि धनंजय पोवार घन:श्यामबद्दल बोलताना दिसत आहे. अंकिता म्हणतेय,”घन:श्यामला खरचं मला मारावसं वाटत होतं… त्याच्या एका शब्दावरही मला विश्वास राहिलेला नाही.
View this post on Instagram
त्याला धावताना पाहून त्याच्या दोन कानाखाली द्याव्याशा वाटत होत्या”. घन:श्यामने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काय कल्ला केलाय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धक :
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण
हे देखील नक्की वाचा….
Bigg Boss Marathi 5: शेवटी आलो, शेवटी जाणार..! सूरज म्हणतोय,”ट्रॉफी मीच जिंकणार”





