Shilpa Shinde | Bigg Boss 18 Finale : टीव्हीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसचा सध्या 18वा सीझन सुरू आहे. या सीझनला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिएलिटी शो चा हा सीझन लवकरच संपणार असून, याच्या ग्रँड फिनालेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
या सीझनमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी चाहत्यांची मने देखील जिंकली. आता फिनालेमध्ये ईशा सिंग, विवियन डिसेना, चुम दारांग या स्पर्धकांमध्ये ट्रॉफी व बक्षिसाच्या रक्कमेसाठी स्पर्धा पाहायला मिळेल. बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
कलर्स टीव्हीवर रात्री 9 वाजता कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पाहता येईल. याशिवाय, जिओ सिनेमाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला विजेतेपदाची ट्रॉफी उचलताना होताना पाहता येणार आहे.
दरम्यान, अश्यातच बिग बॉस 11 ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शिंदे म्हणत आहे की, ‘बिग बॉस’चे निर्माते प्रेक्षकांना मूर्ख बनवतात. शोचे विजेते आधीच ठरवले जातात.
View this post on Instagram
हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा शिंदे म्हणत आहे, ‘मला माहीत नाही, पण काही लोकांना हे समजलंय की निर्माते स्वत:च विजेता निश्चित करतात आणि स्वत:च त्याला विजेता बनवतात. ते स्वत:च्या घरातून उचलून आणतात आणि स्वत:च दाखवतात.
चॅनलची स्ट्रॅटेजी आता लोकांना समजली आहे. म्हणून कदाचित आता बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग कमी झालाय. तुम्ही एका मर्यादेपर्यंत लोकांची फसवणूक करू शकता, त्यानंतर नाही.” शिल्पाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असून, सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
विजेत्याला किती बक्षिसाची रक्कम मिळणार?
फिनालेमध्ये नक्की कोणता स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाला 50 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. जसजसा फिनाले जवळ येत चालला आहे, तसे स्पर्धक व प्रेक्षकांची उत्सुकताही वाढत चालली आहे.
बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी कोणत्या स्पर्धकांमध्ये शर्यत?
बिग बॉस 18 च्या फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी सर्वच स्पर्धकांनी जीवाची बाजी लावली. अनेक टास्क पूर्ण करत हे स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. फिनालेमध्ये करण वीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, चुम दारंग आणि ईशा सिंग हे स्पर्धक पाहायला मिळतील. यापैकी कोणता स्पर्धक विजेता होणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.