Bigg Boss 14 Winner : रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14ची चॅम्पियन

मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘सलमान खान’ याच्या बिग बॉस या रियालिटी शो ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. काल (दि. 21) बिग बॉस 14 या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला असून, सलमान खानने बिग बॉस 14 च्या विजेत्याची घोषणा केली आहे.

यावेळी राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, अखेर रुबीना दिलैकने बाजी मारत बिग बॉस 14 चे विजेतेपद पटकवले, तर राहुल वैद्य उपविजेता ठरला. यंदाच्या सीझनचा विजेता कोण असेल? याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट पाहत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.