हरियाणात मोठा उलटफेर; काँग्रेसचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Haryana Elections Results 2024 | हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतमोजणीदरम्यान मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंतच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसची आघाडी होती. यावेळी हरियाणात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असे मानले जात होते. पण, पुढच्या तासाभरातच आकडेवारी बदलली आणि भाजपने मोठी आघाडी घेतली. त्यामुळे हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचे संकेत मिळत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग मतमोजणीची ताजी आकडेवारी अपडेट करत नसल्यामुळेच भाजप सध्या आघाडीवर दिसत असल्याचे जयराम रमेश यांनी म्हंटले आहे.
लोक सभा नतीजों की तरह हरियाणा में भी चुनावी रुझानों को जानबूझकर चुनाव आयोग की वेबसाइट पर धीमे धीमे शेयर किया जा रहा है। क्या भाजपा प्रशासन पर दबाव बनाने की चेष्टा कर रही है @ECISVEEP?
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) October 8, 2024
याप्रकरणी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली आहे. याबाबत जयराम रमेश म्हणाले की, “आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली असून आता त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवले जात आहेत. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत आहे. हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार असून लोकसभा निवडणुकीवेळी हाच प्रकार घडला होता.”
हा भाजपचा माईंड गेम
पुढे ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे. भाजप प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका उपस्थित होत आहे. पण स्थानिक यंत्रणांवर निवडणूक आयोगाने दबाव आणणे योग्य नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. हा भाजपचा माईंड गेम आहे,” असे जयराम रमेश यांनी म्हटले.
#WATCH | #HaryanaAssemblyPolls2024 | Delhi: Congress General Secretary in-charge Communications, Jairam Ramesh says, “We are filing a memorandum in the next 5-7 minutes. We are lodging a complaint. We hope that the EC will answer our questions. The results of 10-11 rounds are… pic.twitter.com/yCQwNJ9CG0
— ANI (@ANI) October 8, 2024
तसेच त्यांंनी निवडणूक आयोगाने वेगाने आणि योग्य पद्धतीने निकालाची आकडेवारी जाहीर करावी, यामुळे जनतेचा विश्वास कायम राहील, असे आवाहनही केले आहे. सध्या हरियाणात भाजप 50 जागांवर, काँग्रेस 35 जागा, लोक दल 3 आणि अपक्ष उमेदवार हे 3 जागांवर आघाडीवर आहेत.





