राजकारणात मोठी खळबळ…! पडळकरांच्या त्या वक्तव्याबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट म्हणाले…

Sanjay Raut : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीकेची मर्यादा ओलांडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. पडळकरांनी केलेले टीकचे पडसाद सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात उमटले. जयंत पाटील यांच्या समर्थकांनी गोपीचंद पडळकरांच्या फोटोला काळे फासत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत यासंदर्भात कारवाईची मागणी केली.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून भाजपात यावे यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा सनसनाटी दावा राऊतांनी केला आहे.
जयंत पाटील यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव आहे. मात्र तरी सुद्धा ते पक्ष सोडत नसल्याने गोपीचंद पडळकर अशी विधाने करत आहेत, असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राऊत पुढे म्हणाले, येवढा दबाव आणून सुद्धा जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाही, त्याच्यामुळे त्यांचा बाप काढण्याचा उद्योग सुरू आहेत.
पडळकरांनी मात्र….
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांना समज दिली. त्यांनी असे वक्तव्य करणं चुकीचेच असल्याचं फडवणीसांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटलं होतं. मात्र, पडळकरांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारणा केली असता पाहून घेऊ, एवढचं उत्तर दिलं होतं.
हेही वाचा : बिहारमध्ये निवडणुकीचे रंग ; ‘विकास मित्रा’च्या भत्त्यात नितीशकुमारांकडून वाढ





