उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मराठवाड्यातील ‘हा’ बडा नेता शिंदेंच्या गळाला लागला

जालना : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. जालन्यातील घनसावंगी येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1845845241774886943
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हिकमत उढाण हे घनसावंगी विधानसभेतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या विरोधातील प्रबळ दावेदार समजले जातात.
त्यांच्या या पक्ष प्रवेशाने मतदारसंघात राजेश टोपे यांच्या समोर पुन्हा एकदा नव्याने आव्हान उभे राहणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत केवल 3 हजार मतांच्या फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.





