Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ! मंत्रिपद न मिळाल्याने ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

मुंबई : आज नागपूरमध्ये फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. एकीकडे हा सोहळा पार पडत असताना दुसरीकडे नाराजीनाट्य समोर येताना दिसत आहे. मंत्रिपद नं मिळाल्यानं नाराज असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. शपथविधीला काही तास असताना राजीनामा दिल्याने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.
नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. एकनाथ शिंदे भोंडेकरांच्या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आता मंत्री मंडळात त्यांना स्थान नं मिळाल्याने भोंडेकर यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनेकडून आज कोणते मंत्री शपथ घेणार
1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट





