मोठी बातमी ! 2024 मध्ये मविआ एकत्र लढणार का ? शरद पवार म्हणतात,”एकत्र काम करायची इच्छा आहे पण…”

अमरावती – भाजपला विरोध म्हणून काँग्रेस,शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी हे तिन्हही पक्ष एकत्र आले. यातूनच महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापन झाली. मात्र त्यानंतर शिंदे फडणवीस एकत्र आले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यादरम्यानचा घटनाक्रम सर्वांना माहिती आहे. मात्र आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं काय होणार ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 2024 ची निवडणूक तुम्ही एकत्र लढणार का असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे महाविकास आघाडीमधील इतर पक्षांचं मात्र चांगलच टेन्शन वाढणार आहे.
येत्या 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत असून या सभेला पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हजेरी लावणार आहेत. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी आगामी निवडणुकांबाबत भाष्य केलं आहे. 2024 च्या निवडणूक काँग्रेस,राष्ट्रवादी आणि सेना सोबत लढणार का ? तसेच सोबत वंचित आघाडी असणार का ? असा थेट सवाल यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आला.
सोबत निवडणूक लढणार का या सवालावर उत्तर देताना पवार म्हणाले,”वंचित आघाडीशी आमची चर्चा झालेली नाही. वंचितसोबत झालेली चर्चा ही कर्नाटकातील काही जागांपुरतीच मर्यादित होती. बाकी आम्ही एकत्र लढणार वेगैरे.. आज आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे पण इच्छाच केवळ पुरेशी नसते. जागांचा वाटप.. त्यात काही इश्यू आहेत कि नाही.. हे अजून केलेलं नाही.. तर कसं सांगता येईल” असं स्पष्ट मत यावेळी पवारांनी व्यक्त केलं.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही पवार यांनी भाष्य केलं
कोणी फोडायचं काम करत असेल तर ती त्यांची स्टेटर्जी आहे. आम्हाला त्याबाबत भक्कपणाने भूमिका घ्यावी लागले. त्याबाबत आज सांगणं योग्य नाही. आम्ही याबाबत कोणाशी चर्चाच केलेली नाही.





