Ajit Pawar plane accident : २८ जानेवारीला अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. त्यांच्यासह विमानातील पाच जणांना देखील आपले प्राण गमवावे लागले. जवळपास या अपघाताला आता तीन आठवडे पूर्ण झाले असून, अद्यापही विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे हा अहवाल कधी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. या अपघाताचा तपास ब्लॅक्स बॅाक्सच्या आधारे केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, तो जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे तपासात मर्यादा येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्समधून डेटा मिळविण्यासाठी त्याला परदेशात पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी हाचलाची सुरू झाल्या आहेत. अशातच एक महत्वाची माहिती एअर एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोने दिली आहे. ज्या देशात विमान बांधणी झाली आहे, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून या प्रकरणी मदत मागितली आहे, अशी मोठी माहिती एअर एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोने दिली आहे. याचे कारण म्हणजे विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर उच्च तापमानाचा (आगीचा) दुष्परिणाम झाला आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाला आहे. Ajit Pawar विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम ज्या देशात विमान बांधणी झाली आहे, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून मदत मागितली जाणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. रोहित पवारांचा मोठा दावा अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला. त्यांनी मुंबईत विमान अपघातावर प्रेझेंटेन्शनद्वारे तपशील मांडत अनेक दावे केले आहेत. विमान अपघाताची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच राज्याने अपघाताची चौकशी करण्यासाठी सीआयडीला निर्देश दिले आहेत. हेही वाचा : AI Summit: पंतप्रधानांनी हजेरी लावलेल्या ऐतिहासिक पहिल्या ‘एआय समिट’मध्ये धक्कादायक प्रकार ; उद्योजकाचे गॅझेट्स चोरीला