मोठी बातमी ! शरद पवार गटाच्या विजयी उमेदवारांची उद्या बारामतीतून जल्लोषात मिरवणूक

Baramati Lok Sabha Constituency । लोकसभा निवडणुकीच्या निकाल आता हाती येत आहेत. त्यात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यातही काही ठिकाणचे निकाल हे धक्कादायकपणे समोर येत आहेत. दरम्यान, राज्यातील चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळत आहे. आकडेवारी समोर येत असताना पक्षाकडून मोठी घोषणा करण्यात आलीय.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांच्या विजयी उमेदवारांची बारामतीतुन जल्लोषात मिरवणुक निघणार असल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आलीय. उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीत ५ जूनला विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. शरद पवारांनी विजयाच्या जल्लोषासाठी बारामती निवडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या निवडणूक लढवली तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी चुरशीची टक्कर दिली. सध्या सुप्रिया सुळे या तब्बल ३५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.





