मोठी बातमी: पुण्यातील आंदोलनाला मोठं यश; अखेर MPSCची परीक्षा पुढे ढकलली

Pune MPSC Students | पुण्यात मंगळवार पासून विद्यार्थ्यांचे आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आले असल्याने आंदोलन सुरू होते. अखेर विद्यार्थांची या आंदोलनाला यश मिळाले आहे. एमपीएससीच्या आज (गुरुवार) झालेल्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR @CMOMaharashtra https://t.co/uLEWi1xBoE
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 22, 2024
‘आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल,’ असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.
शरद पवारांनीही सरकारला दिला होता इशारा
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्यानं एक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केले होते. याप्रकरणी शरद पवार यांनीही राज्य सरकारला इशारा दिला होता. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरेन, असा इशारा दिला होता.
हेही वाचा:
दोन्ही बाजूला हत्ती अन्… ; थलपती विजयच्या नवीन पक्षाचा झेंडा लॉन्च





