मोठी बातमी! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

Maharashtra Legislative Council Election | विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता येथे कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे 11 सदस्य होणार निवृत्त?
विधान परिषदेवर असणारे 11 सदस्य पुढच्या महिन्यात 27 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. महादेव जानकर, डॉ. मनिषा कायंदे, विजय गिरकर, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, अब्दुल्लाह दुरानी, निलय नाईक, अनिल परब, जयंत प्रभाकर पाटील विधान परिषदेतील या 11 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे ही जागा रिक्त होणार आहे.
असा असणार विधान परिषदेचा कार्यक्रम
विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ जूलै आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख ५ जुलै असेल. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, १२ जुलै रोजीच सायंकाळी ५ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे.
हेही वाचा:




