Vidhanparishad Election 2026 : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मध्ये हालचालींना वेग आला आहे. 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 10 जागांवर मतदान होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा धक्कातंत्र देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यसभेप्रमाणेच यावेळीही अनुभवी नेत्यांना डावलून सामान्य शिवसैनिकाला संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत असला तरी त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Vidhanparishad Election 2026)
दरम्यान, दुसऱ्या जागेसाठी पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. अनेक इच्छूक नेते दुसरी जागा मिळण्यासाठी आग्रही आहेत. यासाठी पक्षातून अनेक नावांची चर्चा होत असली तरी रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत या नेत्यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यापैकी कोणत्या नेत्याना संधी देतात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
विधानसभेत शिंदे गटाचे संख्याबळ 57 असल्याने दुसरी जागा सहज जिंकण्याची स्थिती आहे. मात्र, उमेदवारी कोणाला मिळणार यावर सस्पेन्स कायम आहे. वरील चर्चेतल्या नावांपैकी विनाचर्चेतल्या नावालाही अनपेक्षितपणे लॅाटरी लागल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या सगळ्याचा विचार करता एकनाथ शिंदे उमेदवारीबाबत कोणाला पसंती दर्शवतात यावर राजकीय गणितं अवलंबून असणार आहे.

Eknath Shinde
अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ मिळणार?
याशिवाय, पक्षात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत आमदारांमध्ये नाराजीचा सूर असून, अकार्यक्षम मंत्र्यांना हटवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीत केवळ उमेदवारीच नव्हे, तर मंत्रिमंडळातही बदल होणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ( Vidhanparishad Election 2026
हेही वाचा :Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदींच्या भूमिकेने ठाकरे गटात अस्वस्थता; महिला विधेयक नामंजूर होताच पोस्ट करत म्हणाल्या…