मोठी बातमी! ‘जॅकलीन फर्नांडिस’वर ईडीची कारवाई; जप्त केली तब्बल ७.२७ कोटींची मालमत्ता

मुंबई – २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘जॅकलीन फर्नांडिस’ यांचे नाते सर्वांनाच माहित आहे. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलीनला आतापर्यंत ५.७१ कोटींची महागडी गिफ्ट्स दिली आहेत.
दरम्यान, आता जॅकलीन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. जॅकलिनशी निगडीत जवळपास ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे.
यामध्ये २०० कोटींच्या फसवणुकीमुळे अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याकडून मिळालेली महागडी गिफ्ट्सचा यात समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्या अडचणी आणखी वाढत जाणार की काय.. हे अद्याप स्पष्ठ झालेले नाही.
Enforcement Directorate (ED) has attached assets worth Rs 7.27 crores of Bollywood actor Jacqueline Fernandez, in a money laundering case involving jailed conman Sukesh Chandrashekhar. The attached property is a fixed deposit: Sources
(File pic) pic.twitter.com/mQEZ8rkkju
— ANI (@ANI) April 30, 2022





