Sunil Tatakare : मोठी बातमी…! सुप्रिया सुळेंना वगळून शरद पवार गटातील ७ खासदारांना मोठी अॅाफर ; आता राजकीय उलथापालथ ?

पुणेः २०२९ विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल झाल्यानंतर कधी युती तर कधी आघाडीची सत्ता आली. यामध्ये सत्तेत सहभागी होणाऱ्या आमदारांना वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर अनेकदा अशा प्रकारचे प्रयत्न चालू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. तसा फोन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता संपर्क साधण्यात आलेले खासदार राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात जाणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संपर्क साधण्यात आलेल्या ७ खासदारांनी ही अॅाफर नाकरल्याचे सांगण्यात येत आहे. यावर शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करत सुनील तटकरे यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या पक्षातील सुप्रिया सुळे सोडून इतर ७ खासदारांना तटकरे स्वतंत्रपणे भेटून त्यांना पक्षात येण्याची मोठी अॅाफर दिली आहे. तसेच यावर कोठेही काही बोलू नका असे खासदारांना सांगण्यात आले आहे. ही गोष्ट खासदारांनी सुप्रिया सुळे यांना सांगितली आहे. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या ७ खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
पक्षात सहभागी होण्याची केली विचारणा
राज्यात गेल्या महिन्यांपूर्वी विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कामगिरी फारशी चांगली ठरली नाही. तर महायुतीने राज्यात पुन्हा सत्ता आणत २३५ जागांवर विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची चांगली कामगिरी राहिले. ८ खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा परफॅामर्न्स ढासाळला आणि ८६ उमेदवारांपैकी केवळ ८ खासदार या पक्षाने निवडून आणले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ७ लोकसभा खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात येण्याबाबत विचारणा करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण खासदारांनी ही अॅाफर धुडकावली असल्याची देखील माहिती मिळत आहे.





