Mojtaba Khamenei : मोठी बातमी! अमेरिकेकडून इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनींवर 1 कोटींचे बक्षीस जाहीर
Mojtaba Khamenei : खामेनी यांच्या जागी त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता अमेरिकेने थेट धमकी दिली आहे.

Mojtaba Khamenei : इराण -इस्राइल यांच्यातील संघर्ष सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या काही १६ दिवसांपासून सुरू असलले युद्ध थांबायचे नाव घेत नाहीये. युद्धात इराणला लक्ष्य करण्यात इस्राइलची साथ अमेरिका देत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणाला इशारा देताना दिसत आहेत. अशातच आता अशी एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
खरेतर या युद्धाचा फटका जगभरातील अनेक देशांना बसला आहे. युद्धाची झळ भारताला देखील बसली आहे. इराणने होर्मुज सागरीमार्ग बंद केल्याने निर्यात आणि आयात थांबली आहे. भारतात एलपीजी गॅस सिलेंडर आणि कच्चा तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे युद्ध आखातात पण झळ मात्र भारतात अशा प्रकारचे चित्र असून याबद्दल संताप व्यक्त केला आहे. Mojtaba Khamenei
इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वेाच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांना ठार करण्यात आले. एवढेच नाही तर हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला. खामेनी यांच्या मृत्यूनंतर संघर्ष आणखी वाढला आहे. खामेनी यांच्या जागी त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता अमेरिकेने थेट धमकी दिली आहे. Mojtaba Khamenei
हेही वाचा : Lagaan film: ‘लगान’च्या सेटवर रोज ऐकला जायचा ‘हा’ मंत्र; आमिर खानचा २५ वर्षांनंतर खुलासा
अमेरिकेने मोठी घोषणा केली असून थेट मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei ) यांच्यावर १ कोटींचे बक्षिस जाहीर केले. मोज्तबा खामेनी याला जो कोणी पकडेल किंवा मारेल अशा व्यक्तीला अमेरिकेकडून १ कोटींचे बक्षिस दिले जाणार आहे.
दरम्यान, इराण अमेरिकेकडून येणाऱ्या धमक्यांमुळे आणखी घातक बनला आहे. आणि ज्या कोणत्या आखातील देशामध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ला करण्यास सुरूवात केली. Mojtaba Khamenei

Mojtaba Khamenei, Iran’s new supreme leader
आयातुल्ला अली खामेनी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनी जखमी झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पायाला दुखापत झाली. मात्र, यानंतर मोज्तबा खामेनी यांनी इराणच्या जनतेला संबोधित केले आणि इराण हे युद्ध सुरू ठेवणार असल्याचेही जाहीर केले. मोजतबा खामेनी अजूनही कॅमेऱ्यापुढे आले नाहीत, यामुळे त्यांच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा सुरू आहेत.





