Lagaan film: ‘लगान’च्या सेटवर रोज ऐकला जायचा ‘हा’ मंत्र; आमिर खानचा २५ वर्षांनंतर खुलासा
Lagaan film आमिर खान म्हणाला की ‘लगान’च्या शूटिंगला जाण्यापूर्वी संपूर्ण टीम रोज गायत्री मंत्र ऐकत असे. या सवयीमुळे कलाकार आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये एकाग्रता आणि शिस्त निर्माण व्हायची.

Lagaan film: बॉलिवूडमधील गाजलेला चित्रपट ‘लगान’ याला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने २०२६ मध्ये झालेल्या Red Lorry Film Festivalमध्ये या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात अभिनेता आणि निर्माता आमिर खान उपस्थित होता. त्यावेळी त्याने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची एक खास आठवण सांगितली.
आमिर खान म्हणाला की ‘लगान’च्या शूटिंगला जाण्यापूर्वी संपूर्ण टीम रोज गायत्री मंत्र ऐकत असे. या सवयीमुळे कलाकार आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये एकाग्रता आणि शिस्त निर्माण व्हायची.Lagaan film
त्याने सांगितले की शूटिंगसाठी कलाकार आणि तंत्रज्ञ बसने सेटवर जात असत. त्या प्रवासादरम्यान अभिनेता अखिलेंद्र मिश्रा बसमध्ये गायत्री मंत्र लावायचा. काही कलाकारांना त्या वेळी इंग्रजी गाणी ऐकायची इच्छा असायची, पण आमिर खानने (Amir Khan) मात्र सर्वांनी गायत्री मंत्रच ऐकावा असा आग्रह धरला होता. Lagaan
आमिर खानच्या मते, हा छोटासा पण महत्त्वाचा नियम जवळपास सहा महिने पाळला गेला. रोज सकाळी शूटिंगला जाताना बसमध्ये गायत्री मंत्र ऐकला जायचा. त्यामुळे संपूर्ण टीमचे मन शांत होत असे आणि कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जात असे. “या मंत्रामुळे आम्हाला एकाग्रतेची अवस्था मिळायची आणि टीममध्ये एक वेगळी ऊर्जा तयार व्हायची,” असे आमिर खानने सांगितले.

Lagaan film
आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘लगान’ हा चित्रपट १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. चित्रपटाची कथा ब्रिटिश राजवटीच्या काळातील एका छोट्या गावाभोवती फिरते. त्या काळात गावकऱ्यांवर तिप्पट लगान (Lagaan ) म्हणजेच कर लादला जातो. या अन्यायाला विरोध करण्यासाठी गावकरी ब्रिटिश अधिकाऱ्यांना क्रिकेट सामन्याचे आव्हान देतात.Lagaan film
क्रिकेटमध्ये ब्रिटिशांना हरवले तर गावकऱ्यांना कर माफ होईल, अशी अट ठेवली जाते. क्रिकेटचा अनुभव नसतानाही गावकरी एक संघ तयार करतात आणि कठोर सराव करून ब्रिटिशांच्या संघाविरुद्ध सामना खेळतात. या कथेमुळे चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली.Lagaan film
‘लगान’ला (Lagaan ) समीक्षकांनीही भरभरून दाद दिली होती. इतकेच नव्हे तर या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट’ या विभागात नामांकनही मिळाले होते. त्या काळात हा भारतीय चित्रपटासाठी मोठा सन्मान मानला गेला.Lagaan film
या चित्रपटात आमिर खानसोबत ग्रेसी सिंह, रेचल शेली, सुहासिनी मुले, कुलभूषण खरबंदा, राजेंद्र गुप्ता आणि रघुवीर यादव यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आजही ‘लगान’ हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वात प्रेरणादायी आणि लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो.





