Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. हल्ल्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर दुसरीकडे सरकारने देखील पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तनाविरुद्ध मोठे निर्णय घेतले. ज्यामध्ये पाणी, अन्न, व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी पाणी, व्यापार आणि राजनैतिक पातळीवर मोठे निर्णय घेण्यात आले आहेत ज्याचे पाकिस्तानवर गंभीर परिणाम होतील, ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला आणि स्थिरतेला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानने तेथे असलेल्या भारताच्या राजदुतांनी 30 एप्रिलपर्यंत भारतात परतावं अशा सूचना दिल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान सरकार 1972 मध्ये भारतासोबत झालेला शिमला करार रद्द करण्याचा विचार करत आहे.