Abhijit Dipke : दिल्लीत मध्यरात्री मोठी घडामोड! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना अटक
Abhijit Dipke : अशातच गुरुवारी मध्यरात्री दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

Abhijit Dipke : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर रोजी कनॉट प्लेस, मंडी हाऊससह दिल्लीतील विविध भागांत निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करत १५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले. (Abhijit Dipke)
अशातच गुरुवारी मध्यरात्री दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) मधील कलम १२६ आणि १७० अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. शांतता राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने या तरतुदींचा वापर केला जातो. या प्रकरणी अभिजीत दीपके यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. (Abhijit Dipke)
मात्र, अभिजीत दीपके यांना सध्या नेमके कुठे ठेवण्यात आले आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दिल्ली पोलिसांनी त्यांना अज्ञात ठिकाणी नेल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नसून त्यांना वकिलांशी संवाद साधण्याची परवानगी दिली जात नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.
नेहा बोरा यांची मध्यरात्रीनंतर सुटका (Abhijit Dipke)
दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनाही मंडी हाऊस परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आवश्यक पोलीस प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मध्यरात्रीनंतर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे.
दिल्लीतील या घडामोडींमुळे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, अभिजीत दीपके यांच्या अटकेबाबत आणि त्यांच्या ठावठिकाणाबाबत पुढे काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
Satara: सातारा बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; दसऱ्यापासून कामाला सुरुवात






