Toll Free : आता 100 टक्के टोलमाफी, ‘या’ मार्गावर फ्री प्रवास, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी २०२५’ अंतर्गत राज्यातील प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना १००% टोलमाफी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे मुंबई-पुणे यशवंतराव चव्हण महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग येथे EVs ला एक रुपयाही टोल द्यावा लागणार नाही. हा निर्णय २२ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाला असून, मोटार व्हेईकल अॅक्ट १९५८ अंतर्गत घेण्यात आला आहे.
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या पावलामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळेल आणि पर्यावरण संरक्षणाला मदत होईल.
कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळेल?
महाराष्ट्र EV पॉलिसी २०२५ अंतर्गत टोलमाफी फक्त विशिष्ट श्रेणीच्या इलेक्ट्रिक वाहनांना लागू आहे. यात M2, M3 आणि M6 श्रेणीच्या चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा (जसे की टाटा नेक्सॉन EV, MG ZS EV, महिंद्रा XUV400 सारखी पॅसेंजर EVs) आणि इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. राज्य परिवहन महामंडळ (STU) आणि खासगी कंपन्यांच्या EVs बसेसमध्येही ही माफी लागू होईल.
मात्र, हे वाहने महाराष्ट्रात नोंदणीकृत असावीत आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक (प्लग-इन हायब्रिड किंवा इतर फ्युएलचे नाही) असावेत. या तीन महामार्गांवर EVs ला पूर्णपणे टोलमुक्त प्रवास करता येईल, ज्यामुळे वार्षिक हजारो रुपयांची बचत होईल. इतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर (PWD अंतर्गत) EVs ला ५०% टोल सवलत मिळेल. ही पॉलिसी २०३० पर्यंत लागू राहील आणि त्यासाठी सरकारने १,९९३ कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे.





