व्हॉट्सऍपमध्ये मोठा बदल; यापुढे चॅटचे स्क्रीन शॉट्स घेता येणार नाही !

नवी दिल्ली : मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग मोबाइल अॅप व्हॉट्सअॅप आपल्या अॅपमध्ये सतत विविध बदल करत आहे. अलीकडेच, कंपनीने अनेक सेफ्टी फीचर्स जारी केली आहेत आणि आता कंपनीने आणखी एक मोठे फिचर जाहीर केले आहे, ज्यामुळे बरेच वापरकर्ते तणावात आले आहेत.
मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की ते आता व्हॉट्सअॅपची सुरक्षा मजबूत करणार आहेत. मार्क झुकरबर्गच्या मते, व्हॉट्सअॅप वापरकर्ते यापुढे चॅटचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. त्याची चाचणी iOS तसेच Android च्या बीटा आवृत्तीवर केली जात आहे, तथापि या फीचरसाठी एक अट देखील लागू होईल. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…
‘अशा’ चॅटचे स्क्रीनशॉट्स घेता येणार नाहीत
मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की व्हॉट्सअॅपमध्ये आम्ही लोकांच्या सुरक्षिततेसाठी व्ह्यू वन्स फीचर दिले आहे, जे इमेज आणि व्हिडिओसाठी आहे, पण लोक त्याचा चुकीचा फायदाही घेत आहेत. काही वापरकर्ते व्ह्यू वन्स फीचरने पाठवलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट देखील घेत आहेत. आता कंपनी ते बंद करण्याची तयारी करत आहे, म्हणजेच नवीन अपडेटनंतर, तुम्ही व्ह्यू वन्स फीचरसह पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. मात्र सामान्य चॅटचे स्क्रीनशॉट घेण्यावर कोणतेही बंधन नसेल.
WABetaInfo ने व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरबद्दलही माहिती दिली आहे. कंपनी व्ह्यू वन्स फीचरसह मेसेजचा स्क्रिनशॉट घेण्यास नकार देईल, पण मेसेज पाठवणाऱ्याला त्याची सूचना मिळणार नाही.
* न कळवता ग्रुप सोडू शकता
व्हॉट्सअॅप आणखी एका नवीन फीचरवरही काम करत आहे, जे आल्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये असाल आणि तो ग्रुप सोडलात तर कुणालाही याची माहिती मिळणार नाही. सध्या, सर्व वापरकर्ते जेव्हा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडतात, तेव्हा त्यांना सूचना मिळते. कंपनी आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे. नवीन अपडेटनंतर, तुम्ही ग्रुपमध्ये सामील होताच, तुमचा नंबर बाय डीफॉल्ट (स्वयंचलितपणे) लपविला जाईल, म्हणजे, तुम्ही ग्रुपमध्ये असलात तरी कोणत्याही सदस्याला तुमचा नंबर दिसणार नाही. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही स्वेच्छेने नंबर शेअर करू शकता. तुमचा नंबर संबंधित ग्रुपमध्ये शेअर करू शकता.




